|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पर्रीकरांची अनुपस्थिती

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पर्रीकरांची अनुपस्थिती 

प्रतिनिधी/ पणजी

रविवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपस्थिती लावली नाही. मात्र गोव्यातून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित राहिले. गोव्यासंदर्भात या बैठकीत कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात ‘अटल मंत्र’ भाजपने कार्यकर्त्यांना दिला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेत उपचार घेऊन गुरुवारी गोव्यात परतले असून ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यामुळे आपल्या घरातूनच त्यांनी कामकाज पाहिले. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने तशी गरजही भासली नाही.

मुख्यमंत्री पर्रीकर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला उपस्थिती लावतील अशी अपेक्षा होती, मात्र ते या बैठकीला जाऊ शकले नाहीत. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी उपस्थिती लावली. मार्च 2019 पर्यंत गोव्यात कशा पद्धतीने पक्षकार्य पुढे नेले जाईल याचा आराखडा त्यांनी अध्यक्षांना सादर केला. तळागाळात काम करण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीत प्रसारमाध्यमांवर अधिक लक्ष न देता काम करा, असा सल्ला राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा, असा संदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: