|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सांबरा एटीएसला ट्रेनिंग कमांड प्रमुखांची भेट

सांबरा एटीएसला ट्रेनिंग कमांड प्रमुखांची भेट 

प्रतिनिधी/ बेळगाव

सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलला बेंगळूर येथील ट्रेनिंग कमांडचे एअरऑफीसर कमांडिंग इन चीफ एअरमार्शल राकेशकुमारसिंग भादुरिया यांनी भेट दिली.

एअरकमांडर आर. रविशंकर यांनी त्यांचे स्वागत केले. शुक्रवार दि. 7 व शनिवार दि. 8 अशा दोन दिवशीय वास्तव्यात त्यांनी एटीएसमार्फत घेतल्या जाणाऱया सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती घेतली. प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्याशी बातचित करुन विविध प्रशिक्षण पध्दतींचा आढावा घेण्यात आला. टिळकवाडी येथील फिल्डक्राफ्ट ट्रेनिंग स्थळाचीही त्यांनी पाहणी केली.

प्रशिक्षणाचा दर्जा कायम राखला पाहिजे. कारण आजचे प्रशिक्षणार्थी हेच भारतीय वायु दलाचे भविष्य आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. तसेच एकंदर कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Related posts: