|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News » भारत बंद : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ

भारत बंद : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. मराठवाडय़ातील परभणीत तर पेट्रोलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 23 पैशांनी वाढ झाली. पेट्रोलचे दर नव्वदच्या घरात गेल्याने लवकरच हे दर शंभरी ओलांडण्याची शक्मयता आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 88.12 रुपये तर डिझेल 77.23 रुपयांवर पोहोचले आहे. तर पुण्यात आज पेट्रोलचा भाव 87.28 रूपये एवढा आहे. दररोजच्या तुलनेत पुण्यात 0.47 पैशांनी वाढ झाली आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत परभणीत (89.88 रुपये प्रति लिटर) सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. तर डिझेल (77.83 रुपये प्रति लिटर), धुळय़ात पेट्रोलचा दर (88.05 रुपये प्रति लिटर), नाशिकमध्ये पेट्रोल (88.50 रुपये प्रति लिटर) तर नांदेडमध्ये पेट्रोल (88.71 रुपये प्रति लिटर), नंदूरबारमध्ये पेट्रोलचा दर (88.98 रुपये प्रति लिटर), तर डिझेलचा दर 76.91 रुपये प्रति लिटर आहेत. तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 80.73 रुपये आणि डिझेलचा दर 72.83 रुपये प्रतिलिटर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे तेल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची होत असलेली दिवसेदिवस घसरण हेही यामागचे कारण सांगण्यात येत आहे. इंधनदरात सतत वाढ होत असल्याने याविरोधात विरोधकांनी आज भारत बंद पुकारला आहे.