|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी गप्पा का : राहुल गांधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी गप्पा का : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या दरांवर नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱयांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेने मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारने गेल्या 4 वर्षांमध्ये काय केले, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.

सध्या देशातील कोणालाही योग्य दिशा सापडत नाही. फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असे म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधर्जिणे असल्याचा आरोप केला. तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱयांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. चार वर्षांपूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 रुपयांचा झाला आहे. मात्र तरीही मोदी मूग गिळून गप्प आहेत. आज देशातील काही मोजक्मयाच लोकांना योग्य दिशा सापडली आहे. मोदींच्या उद्योगपती मित्रांचे सर्वकाही उत्तम सुरू आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.

 

Related posts: