|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » श्री फाऊंडेशन तर्फे गणपती दान योजना आळंदी घाटत राबविण्यात येणार योजना

श्री फाऊंडेशन तर्फे गणपती दान योजना आळंदी घाटत राबविण्यात येणार योजना 

ऑनलाईन टीम / पुणे :

गणेशमुर्ती विसर्जनानंतर त्याची विटंबना होऊ नये, तसेच पर्यावरण प्रदुषणाला आळा बसावा या उद्देशाने श्री फाऊंडेशन पुणे तर्फे प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही गणपती दान ही योजना राबविण्यात येणार आहे., अशी माहिती संस्थेचे सदस्य सागर पाडाळे यांनी दिली. ते येथील पत्रकार भवनमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदे प्रसंगी बोलत होते.

यंदा हा उपक्रम आळंदी घटात अनंत चतुदर्शी पर्यंत राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत या दान केलेल्या गणपती मुर्ती पुढच्या वर्षी परत रंगकाम करून पुन्हा विक्रीस ठेवण्यात येतात. व जमाझालेलेला निधी अनाथ मुलांसाठी वापरला जातो. एकुणच या उपक्रमांतर्गत गणपतींच्या मुर्तीची विटंबना, नदीचे प्रदुषण रोखता येते. व अनाथ मुलांसाठी उपयोगी ठरते, असे यावेळी सांगण्यात आले.

Related posts: