|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून गणेशभक्त व पोलिसांची आरोग्यसेवा

मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून गणेशभक्त व पोलिसांची आरोग्यसेवा 

ऑनलाईन टीम / पुणे :

 

  • निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे विश्रामबाग फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात विनामूल्य सुविधा

 

गणेश आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरात येणाऱया लाखो भाविकांसाठी तसेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱया पोलिसांच्या सेवेसाठी मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. उत्सवात निर्माण होणाऱया आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी डॉक्टर व कार्यकर्त्यांची टिम मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून सलग 11 दिवस कार्यरत राहणार आहे. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवात पोलीस अधिकारी, कर्मचारी व गणेशभक्तांसाठी विश्रामबाग फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात या मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी दिली. ते येथील पत्रकार भवनमध्ये सोमावारी आयोजित पत्रकार परिषदे प्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्याध्यक्ष जगदीश मुंदडा, निलेश सोनिगरा, संजीवन हॉस्पिटलचे डॉ अनिल शर्मा उपस्थित होते. हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवार सायंकाळी 5 वा. पोलीस व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. येथे सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाईन, बेड यांसह अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांकरीता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणेसह डॉक्टर व नर्सची 18 जणांची टीम आहे. याचबरोबर याकाळात निवडक गरजू रूग्णांना विशेष कूपन देण्यात येणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दरम्यान संजीवन हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी, एक्स रे, तपासणत 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.