|Saturday, November 17, 2018
You are here: Home » उद्योग » ई वाहनांसाठी हिरवी नंबरप्लेट

ई वाहनांसाठी हिरवी नंबरप्लेट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र नंबरप्लेट सादर करण्यात येणार आहे. ई वाहनांसाठी हिरव्या रंगाची स्वतंत्र नंबरप्लेट असेल अशी घोषणा भारत सरकारकडून करण्यात आली. इलेक्ट्रिक कारमध्ये महिंद्रा इलेक्ट्रिकच्या महिंद्रा ईव्हेरिटो या कारला सर्वप्रथम नंबरप्लेट देण्यात येईल. बेंगळूरमधील स्टार्टअप लिथियम अर्बन टेक्नोलॉजी ही सर्वात अगोदर हिरव्या रंगाची नंबरप्लेट असणारी कार घेणार आहे.

हिरव्या रंगाची नंबरप्लेट असल्याने ई वाहनांच्या वापरासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण होत वाढ होईल असे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याव्यतिरिक्त पर्यायी इंधनावर धावणाऱया सर्व वाहनांना हिरव्या रंगाची नंबरप्लेट देण्यात येईल. सीएनजी, मेथॉनॉल आणि जैव इंधनावरील वाहनांही ही खास नंबरप्लेट असेल. रिक्षा, टॅक्सी आणि बस यासह सर्व वाहने संपूर्ण भारतभर परवानामुक्तपणे धावतील. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला सर्व राज्यांनी मंजुरी दिल्याचे गडकरींनी सांगितले.

पर्यावरणपूरक अशा खासगी वाहनांच्या नंबरप्लेटवर सफेद रंगाचा फॉन्ट आणि व्यावसायिक वाहने, टॅक्सीवर पिवळय़ा रंगाचा फॉन्ट असेल. नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहकांचा वापर करावा यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यात ई वाहनांसाठी दीर्घकाळ, सुरळीत लागू करता येईल असे धोरण जाहीर करण्यास वाहन कंपन्यांकडून सरकारला आवाहन करण्यात आले. स्थिर धोरण राबविल्यास पुढील पाच वर्षात 15 टक्के ई वाहने असण्याचा अंदाज आहे.

Related posts: