|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘भारतमाता’ मंदिरावरून विहिंप-तोगडिया समोरासमोर

‘भारतमाता’ मंदिरावरून विहिंप-तोगडिया समोरासमोर 

गांधीनगर :

गुजरातच्या गांधीनगरमध्ये उभारल्या जाणाऱया भारतमाता मंदिरावरून विश्व हिंदू परिषद आणि प्रवीण तोगडियांची संघटना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेदरम्यान वाद पेटला आहे. या मंदिरावर हक्क दर्शविण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

 आपण उभारत असलेल्या भारतमाता मंदिराच्या परिसरात विहिंपचे नेते रविवारी बळजबरीने शिरल्याचा आरोप आंहिंपने केला आहे.

गांधीनगरमध्ये मागील 4 वर्षांपासून भारतमाता मंदिर उभारले जात असून याचे काम अद्याप सुरूच आहे. वाद झाल्यावर आंहिंप नेत्यांनी पोलीस स्थानकात जात तक्रार नेंदविली आहे. आगामी काळात हा वाद आणखीन चिघळणार असल्याची शंका व्यक्त होतेय.

विहिंपचे नेते अश्विन पटेल, भूपेंद्र राव आणि नवनीत पटेल सुमारे 25 जणांच्या जमावासह मंदिर परिसरात दाखल झाले. आंहिंपच्या मालमत्तेत हे सर्व जण बळजबरीने दाखल झाले. सरकारचा आपल्याला पाठिंबा असून ही मालमत्ता आम्हाला द्यावी लागेल, असा दावा विहिंपच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आंहिंपच्या गुजरातमधील संयुक्त सचिवाने केला. या मालमत्तेवर आंहिंपचा अधिकार असल्याचे पुरेसे दस्तऐवज आमच्याकडे आहे. दोन दशकांपासून आंहिंपचा यावर ताबा असल्याचेही ते म्हणाले. या मंदिरात भारतमातेची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. तोगडियांनी विहिंपमधून बाहेर पडत आंहिंपची स्थापना केली आहे.

Related posts: