|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तालिबानच्या हल्ल्यात अफगाणचे 37 जवान ठार

तालिबानच्या हल्ल्यात अफगाणचे 37 जवान ठार 

काबूल 

 अफगाणिस्तानच्या उत्तर भागात दहशतवादी संघटना तालिबानने अनेक ठिकाणी सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. मागील दोन दिवसांमध्ये करण्यात आलेल्या या हल्ल्यांमुळे 37 सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. कुंदुजमध्ये रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत एका सुरक्षा चौकीवर झालेल्या संघर्षात 13 जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 15 जवान जखमी झाल्याची माहिती प्रांतीय परिषदेचे प्रमुख मोहम्मद युसूफ अयूबी यांनी दिली. याचदरम्यान तालिबानी दहशतवाद्यांनी जाजौन प्रांताच्या खामयाब जिल्हय़ात हल्ला चढविला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अफगाणी जवानांना जिल्हा मुख्यालय सोडावे लागले. येथे झालेल्या चकमकीत 8 पोलीस मारले गेले. तालिबानने कुंदुज आणि जाजौन प्रांतात झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.