|Thursday, February 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘तेजस’चे इंधन पुनर्भरण यशस्वी

‘तेजस’चे इंधन पुनर्भरण यशस्वी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताच्या स्वदेशी ‘तेजस’ या लढाऊ विमानात आकाशातच इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ही क्षमता जगातील केवळ चार देशांकडेच आहे. आता त्यांच्या पंक्तीत भारतही पाचवा देश म्हणून बसणार आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संबंधात भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले आहे.

इंधनाच्या आकाशातील पुनर्भरणामुळे तेजस बराच काळ आकाशात राहू शकेल, तसेच शत्रूच्या प्रदेशात खोलवर मुसंडी मारू शकेल. परिणामी, हे विमान भारताच्या वायूसामर्थ्याचा आधारस्तंभ होण्यास साहाय्य होणार आहे, अशी माहिती वायुदलाच्या अधिकाऱयांनी दिली.

यापूर्वी 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला इंधन भरण्याच्या प्राथमिक चाचण्या पार पडल्या होत्या. त्या चाचण्यांमध्ये प्रत्यक्ष इंधन न भरता केवळ तशी जुळणी करता येते की नाही, याची पाहणी करण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर सोमवारी प्रत्यक्ष इंधन भरण्यात यश मिळाले आहे. वायुदलाच्या 2-78 प्रकारातील इंधन वाहक विमानातून हे इंधन तेजसमध्ये भरण्यात आले. अशा आणखी चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यात समाधानकारक यश मिळाल्यास प्रत्यक्ष युद्धातही अशा प्रकारे इंधनाचे पुनर्भरण करणे शक्य होणार आहे.

Related posts: