|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » दुखापतीमुळे चंडिमल आशियाई चषक स्पर्धेतून बाहेर

दुखापतीमुळे चंडिमल आशियाई चषक स्पर्धेतून बाहेर 

वृत्तसंस्था / कोलंबे

संयुक्त अरब अमिरात येथे येत्या शनिवारपासून सुरू होणाऱया सहा देशांच्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पधेंला लंकेचा कसोटी कर्णधार दिनेश चंडीमलला मुकावे लागत आहे. दुखापतीमुळे चंडीमलने या स्पर्धेतून आपण माघार घेत असल्याचे लंकन क्रिकेट मंडळाला कळविले आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंकेचा 16 जणांचा संघ जाहीर करण्यात आला असून मॅथ्यूजकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

28 वर्षीय चंडीमलच्या हाताच्या बोटाला स्थानिक टी-20 स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने त्याने आपण आशिया चषक स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे लंकन क्रिकेट मंडळाला कळविले आहे. आता चंडीमलच्या जागी लंकन संघात यष्टीरक्षक फलंदाज डिक्वेलाचा समावेश करण्यात आला.

लंकन संघ- अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, कुशल मेंडीस, थरंगा, डिक्वेला, गुणतिलका, थिसेरा परेरा, डी.शेनका, धनंजय डिसिल्वा, ए. धनंजय, डी. परेरा, ए अपोन्सो, के. रजिता, लकमल, डी.चमिरा आणि मलिंगा.

Related posts: