|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » करडवाडी येथे चावडी वाचन

करडवाडी येथे चावडी वाचन 

वार्ताहर/ करडवाडी

महाराजस्व अभियानांतर्गत गावभेट या संकल्पनेद्वारे पूर्वीकाळी मयत झालेल्या वारसांच्या नोंदी अजून देखील प्रलंबित असल्याने अशा वारसांच्या नोंदणी होणे गरजेचे असल्याने ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचे मत प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी व्यक्त केले. ते करडवाडी (ता भुदरगड) येथे चावडी वाचन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते

येथील विठ्ठल मंदिरात हा चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी करडवाडी गावच्या 385 भूमापन गटाचे वाचन तलाठी एच. डी. पाटील यांनी केले. सातबारा मयत प्रकरणे 29 एकत्र कुटुंब प्रमुख प्रकरणे 17 अनाधिकृत बिगर शेती प्रकरणे 3 तर जलसिंचनाच्या व झाडांच्या नोंदही यावेळी घेण्यात आल्या. मयत खातेदारांच्या वारसाकडून वारसा अर्ज घेऊन फेरफार नोंदवून वारसांची नावे सात-बारावर नोंद करण्यात येणार आहेत. तसेच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब प्रमुखाचे नोंदी कमी करून वारसांची नावेही दाखल करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने तलाठी पाटील यांच्याकडून या नोंदणीचा शोध घेऊन लोक जागृती करून मोहिमेला व्यापक प्रसिद्धी देऊन लोकांच्याकडून 25 अर्ज स्वीकारून मंडल अधिकारी यांच्यामार्फत वारसा ठराव मंजूर करून त्यांच्या फेरफाराच्या नोंदी सात-बारावर घेण्यात आले आहेत. यावेळी मंडलाधिकारी सुंदर जाधव, उपसरपंच सागर खतकर, ग्रा.सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार ग्रामसेवक रमेश लोकरे यांनी मानले.

 

 चॉकट- स्वत:खुर्चीवर न बसता ग्रामस्थांमध्ये खाली बसून पिक परिस्थितीचा अंदाज घेणारे हे जिह्यातील पहिलेच प्रांताधिकारी असावेत. शेतकऱयां†िवषयी आस्था, जिव्हाळा, आपुलकीपणा यामुळे शेतकऱयांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Related posts: