|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तमदलगेतील सुतगिरणी आदर्शवत बनविण्याचा निर्धार

तमदलगेतील सुतगिरणी आदर्शवत बनविण्याचा निर्धार 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पेरणेतून व मदतीमुळे 26 वर्षापूर्वी स्थापन केलेली सुतगिरणी सभासदांच्या प्रेमावर व विश्वासास पात्र राहून प्रगती करत आहे. संस्थेला कोणत्याही बँकेचे कर्ज नाही, केवळ काटकसरीने संस्था चालविल्याने चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 18 लाखाचा नफा झाला आहे. भविष्यामध्ये 25 हजार चाहत्यांची पुर्ण क्षमतेने गिरणी सुरू करण्याचा मानस आहे. शासनाकडून 5 कोटीचा निधी मिळाला आहे. मात्र सभासदांच्या जात पडताणी प्रमाणपत्राच्या जाचक अटीमुळे हा निधी वापरता आलेला नाही. यातून मार्ग काढून राज्यातील एक आदर्शवत सुतगिरणी बनवू, असा विश्वास अध्यक्ष डॉ. अशोकराव माने यांनी व्यक्त केला.

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी साईट तमदलगे येथे 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी अशोकराव माने बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अरूण इंगवले, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा डॉ. निता माने उपस्थित होत्या.

प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष अनिलराव कांबळे-माणगावकर यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन संचालक वैभव पाटील यांनी केले. सर्व ठरावांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना अरूण इंगवले म्हणाले, सध्या वस्त्रोद्योग खुप अडचणीतून जात आहे. सरकारची या गोष्टीकडे लक्ष नाही. 2300 सभासदांचा विश्वास संपादन करून अशोकराव माने यांनी संयमी नेतृत्व करीत संस्था भरभराटीस आणली आहे. शिरोळ तालुक्याबरोबर हातकणंगलेचाही विकास साधण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्या पाठिशी आनंदाने उभा राहिन, असे सांगितले.

विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांनी वस्त्रोद्योगाकडे शासनाचे पूर्णपणे दुलर्क्ष झाले असून हजारो कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशोकराव माने यांनी चिकाटीने गिरणी सुरू ठेवली असली तरी वस्त्रोद्योग व्यवसाय संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. नव्या पिढीला बदल अपेक्षित असून त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. दळपशाहीचे शासन आहे काय? अशी भिती वाटू लागली असून सुताबरोबर साखरेचीही परिस्थिती फार वेगळी नसल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, प्रकाश खोबरे, नगराध्यक्षा डॉ. निता माने, गुरूदत्त शुगर्सचे राहुल घाटगे यांनी मनोगते व्यक्त केली. शिवाजीराव देशमुख, गोरखनाथ माने, मनोहर अडसुळे, बाबगोंडा पाटील, बबन चोकाककर, वसंतराव माने, जर्नादन कांबळे, केशवराव माने, बाळासाहेब माळी, नंदू सुतार, पोपटराव माने आदींच्यासह सर्व संचालक, सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर जी. आर. माने यांनी केले. आभार डॉ. अरविंद माने यांनी मानले.

Related posts: