|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उध्दव ठाकरे म्हणाले बरडेंचे यादीत नाव कसे नाही?

उध्दव ठाकरे म्हणाले बरडेंचे यादीत नाव कसे नाही? 

नाराजांची गौरी -गणपती नंतर  पदांवर प्रतिष्ठापना

विशेष प्रतिनिधी/ सोलापूर

जिह्याच्या शिवसेना पदाधिकारी निवडीत बाजूला सारल्यावरून नाराज झालेल्या ‘त्या’ संबंधीत माजी पदाधिकाऱयांचा मुंबईत ‘मातोश्री’ वर रूसवा काढण्यासाठी गौरी -गणपतीनंतरचा ‘मुहूर्त’ काढला जाणार असून शिवसेनेचा  नाराज गट कोणत्याही परिस्थितीत पालककमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाता कामा नये, यासाठी  मोठी खलबते होणार असल्याची माहिती मातोश्रीवर राबता असणाऱया शिवसेनेच्या एका उच्च पदस्थ नेत्याने सोमवारी खास तरूण भारत संवादला मुंबईतुन दिली.

  विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱयांच्या ज्या निवडी झाल्या आहेत. त्यामध्ये बहूतेक कोणताही बदल न करता, निवडीवेळी ज्यांना बाजूला ठेवण्यात आले अशा पक्षातील ‘वजनदार’ माजी पदाधिकाऱयांना नव्या जबाबदारीचे पदे देवून त्यांचे सन्मानाने पुर्नवसन केले जाणार आहे. निवडीवरून जे  नाराज आहेत त्यांची गौरी -गणपतीनंतर क्रेझनुसार सेनेतील काही पदांवर प्रतिष्ठापना करून नाराजी दूर करण्याचा घाट घातला जाणार आहे.

  उल्लेखनीय बाब म्हणजे सोलापूर जिल्हा शिवसेना नुतन पदाधिकारी निवडी आणि त्यानंतर नाराज गटांनी फोडलेल्या असंतोषाच्या डरकाळ्या, भाजपात जाण्याचा घेतलेला पवित्रा  या सर्व बाबी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी जिह्याची निवडलेली पदाधिकाऱयांची यादी मागवून घेतली. या यादीत माजी समन्वयक पुरूषोत्तम बरडे यांचे नाव दिसेना तेव्हा खुद्द उध्दव ठाकरे यांनी बरडे यांचे नाव यादीत कसे नाही ? असा सवाल उपस्थित केला. 34 वर्षापासून प्रत्येक निवडीवेळी स्थान दिलेल्या बरडेंना का वगळ्यात आले याची कारणविंवसा त्यांनी विचारली आणि बरडेंना नवी जबाबदारी देण्यासंबंधी काही सुचक वक्तव्ये ठाकरे यांनी केल्याचे सांगण्यात आले.

 बार्शीचा लढवय्या शिवसेनेचा गट भाजपात गेला. त्याप्रमाणे कुर्डूवाडीचा माजी जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळेंचा गट तसेच येथील नगराध्यक्ष व बारा नगरसेवक   यांचा गट जिह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपात  sगेल्यास  सेनेला सोलापूर जिह्यात मोठी किंमत मोजावी लागेल. तसे होवू नये यासाठी शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर प्रयत्न करत आहेत.

  

नार्वेकरांसमोर येणार खुशी अन् गमवालेदेखील

नव्या निवडीत ज्यांना संधी देण्यात आली आहे ते सर्व पदाधिकारी तसेच निवडीत ज्यांना डावलेले गेले ते सर्व म्हणजे पुरूषोत्मम बरडे, धनंजय डिकोळे, डॉ. धवलसिंह मोहिते – पाटील आदी सर्वांची बैठक शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Related posts: