|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात विविध संघटनांची निदर्शने

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात विविध संघटनांची निदर्शने 

प्रतिनिधी/ बेळगाव

पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. दररोज या दोन्ही वस्तुंचे दर वाढु लागले आहेत. त्यामुळे महागाई भडकत चालली आहे. त्या विरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिली होती. त्याचबरोबर केंद सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याचे ठरविले होते. त्यामुळे येथील काँग्रेससह इतर संघटनांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत. इंधन वाढल्यामुळे सर्वच  जिवनावश्यकवस्तु महाग होत चालल्या आहेत. सिलिंडर देखील महागले आहे. त्याविरोधात सर्वसामान्य जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी मोर्चा काढुन निवेदन दिले.

काँग्रेसची कित्तूर चन्नम्मा चौक येथे निदर्शने

शहर काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार विरोधात कित्तूर चन्नम्मा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेस सरकार असताना पेट्रोल दरवाढी विरोधात जोरदार टिका करणारे आता का पेट्रोल व डिझेलचे दर वाढवत आहेत? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकार पूर्णपणे गरीब विरोधी सरकार आहे. मोठय़ा उद्योजकांना पाठिशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात येत होता. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करुन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ, राजू सेठ, जयश्री माळगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

केएसआरटीसी कर्मचारी संघटनेचे निवेदन

इंधन दरवाढीमुळे सर्वात मोठा फटका केएसआरटीसीला बसू लागला आहे. गोर-गरीब जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सेवा बजावत असलेल्या केएसआरटीसीला फटका बसल्यामुळे कर्मचाऱयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

राज्यात जवळपास 26 हजार बसेस आहेत. राज्यातील जनतेला उत्तम सेवा देत आहेत. या सेवेबद्दल अनेक पारितोषिके मिळाली आहेत. 1 लाख 20 हजार कर्मचारी आहेत. ते कायम काम करत आहेत. पण आता इंधन दरवाढीमुळे आर्थिक बाब पूर्णपणे कोलमडणार आहे. या दरवाढीमुळे केएसआरटीसीला मोठा फटका बसू लागला आहे. यामुळे कामगारांचे पगार वेळेत होणे कठीण बनले आहे.

दिव्यांग, विद्यार्थी, अनुसुचित जातीजमाती आणि ज्ये÷ांना मोफत प्रवास केएसआरटीसी देत आहे. याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनाही कमी दरामध्ये पास देवून सेवा बजावण्याचे काम केएसआरटीसी करत आहे. यासाठी काटकसर करुन आतापर्यंत केएसआरटीसीने सेवा दिली आहे. मात्र यापुढे सेवा देणे अवघड जाणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. तेंव्हा तातडीने इंधनदरवाड कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केएसआरटीसी कामगार युनियनचे जनरल सेपेटरी सी. एस. बिदनाळ, व्ही. एफ. कोलकार, ऍड. नागेश सातेरी, एस. एन. बेन्नी, बी. व्ही. नरसण्णावर, एस. व्ही. माने यांच्यासह कामगार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने दरवाढ करुन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला आमचा जाहीर पाठिंबा असून केंद्र सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने निवेदनाव्दारे केली आहे.

भाजप सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिन येतील, असे सांगितले. मात्र आता सर्वसामान्य जनतेचे बुरे दिन सुरु झाले आहेत. त्यामुळे शेतकरी व कष्टकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा प्रकारे जर इंधन दरवाढ होत राहिली तर अजूनही महागाईचा भडका उडणार आहे. तेंव्हा तातडीने इंधनदरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी सदानंद पाटील, मुनीर लतीफ, सुरेंद्र तळवलकर, इस्माईल मुल्ला, दुर्गेश मेत्री, के. जी. पाटील, आर. के. सांबरेकर, प्रभावती भालेकर, नारायण बसर्गे, बाळाप्पा पाटील, धनपाल अक्षीमनी, संजय कोलकार, आप्पासाहेब नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जय भीम ओम साई संघटनेचे निवेदन

महागाई वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. पेट्रोल-डिझेल याचे तर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत.जर अशी महागाई वाढत राहिली तर सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण जाणार आहे. तेंव्हा तातडीने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी जयभीम ओम साई संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.

गॅस सिलिंडर, इतर जिवनावश्यक वस्तु गेल्या तीन महिन्यामध्ये 15 ते 20 टक्क्मयाने वाढल्या आहेत. जर अशीच वाढ होत राहिली तर मोठा भडका उडाणार आहे. तेंव्हा तातडीने वाढविलेले दर कमी करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजू ठोंबरे, बडेजान मुगुटसाब, चरणसिंग धुमुणे, श्रीकांत टिंबरे, महादेव नारोळकर, सिकंदर शेखवाले, महादेव माने, सुनील राठोड, शंकर ठोंबरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: