|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रिक्षा संघटनेकडून केंद्र सरकारचा निषेध

रिक्षा संघटनेकडून केंद्र सरकारचा निषेध 

सावंतवाडी

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ केल्याने महागाई वाढली आहे. दरवाढीमुळे रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ रिक्षाचालक-मालक संघटनेने पाच दिवस काळय़ा फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. जिल्हय़ातील सर्व रिक्षाचालकांनी 14 सप्टेंबरपर्यंत काळय़ा फिती लावून निषेध करावा. गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी चांगली सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हा रिक्षा संघटनचे सेक्रेटरी सुधीर पराडकर यांनी केले आहे.

 

Related posts: