|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पाकिस्तानचे माजी पंतप्रधन नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम नवाज यांचे निधन झाले. 68 वषीय कुलसुम नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पाकिस्तान मुस्लमि लीग-नवाजचे अध्यक्ष शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांचे पुत्र हुसेन नवाज यांनी कुलसुम यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुलसुम नवाज यांना घशाचा कॅन्सर होता. त्यांच्यावर जून, 2017 पासून लंडनच्या हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते.उपचारादरम्यानच त्यांच्या फुफ्फुसामध्ये इनफेक्शन झाले होते. सोमवार रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती. परंतु आज कुलसुम नवाज यांनी अखेरचा श्वास घेतला.