|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » ‘सायबर क्राइम’ भविष्यातील भारतापुढील आव्हान ; माजी पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांचे मत

‘सायबर क्राइम’ भविष्यातील भारतापुढील आव्हान ; माजी पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांचे मत 

ऑनलाईन टीम / पुणे :

सायबर क्राईम हे भविष्यातील मोठे आव्हान आहे. कॉसमॉस बँकेच्या हॅकिंगचे उदाहरण ताजे आहे. आता परदेशातून पैसे लुटले जात आहेत. हॅकिंग करून सारं काही नेस्तनाबूत करू शकतात. यासाठी आपण काही विशेष यंत्रणा उभारणार आहोत की नाही? हे आव्हान परतवणे सोपे नसले तरी त्याविरोधात मोठी मोहीम आखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र व पंजाबचे माजी पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी पुण्यात व्यक्त केले. श्रमीक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ‘भारतापुढील सुरक्षिततेची आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी देशातील विविध समस्या मांडल्या.

देशासमोर दिवसेंदिवस नवी आव्हाने निर्माण होत आहेत. आपण फक्त समस्यांची फक्त लिस्ट तयार करत आहोत. मात्र त्यावर तोडगा शोधत नाही. बँकिंग फ्रॉडस् ही सुद्धा आज मोठी समस्या आहे. मल्ल्यासारखे उद्योजक काही करोड रुपये बँकांतून लुटून नेत आहेत. लोकांचे बँकेतील पैसेही सुरक्षित नाहीत. याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.

नक्षलवाद समस्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशव्यापी झाली आहे. सुरक्षा यंत्रणासाठी ही पण एक मोठी डोकेदुखी झाली आहे. गँगस्टर पुन्हा डोके वर काढतायत. मुंबई, वेस्टर्न युपी, हरयाणा आणि पंजाबमध्ये गँगवॉर आहे. अंडरवर्ल्ड माफियांच्या कारवाया सुरू आहेत. त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. मनी आणि मसल पॉवरवर अनैतिक धंदे चालवले जात आहेत. करप्शन तर सुरूच आहे. ते बंद झालेले नाही. नोकरी, बदली पाहिजे असेल तर पैसे लागतात. हे थांबवू शकत नाही पण त्याविरोधत ठोस ऍक्शन घेण्याची गरज आहे. खूप मोठय़ा पातळीवर हे सुरू आहे. मी स्वतः दिवाळीत कोणाला गिफ्ट दिलेले नाही आणि घेतलेले नाही. आपल्यापासूनच ही करप्शनची सुरूवात थांबवली पाहिजे. देशातील युवा दबावाखाली वावरत आहे. त्यांना नोकऱया नाहीत त्यामुळे त्यातून ड्रग्ज वगैरे सारख्या घातक व्यसनांच्या आहारी युवा जात आहेत. परिणामी देशाचे भविष्य बिघडत आहे. आर्मी सेक्मयुरिटी फोर्सेसवर मोठे दडपण असते. कश्मीरसारख्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, सर्जिकल स्त्राईकचा किती परिणाम झाला हे पाहणेही गरजेचे आहे. त्याठिकाणी जिहादी मिलिटन्सी, सोशल चॅलेंजेस वाढत आहेत. ही लढाई खूप मोठी आहे. आपला कोणत्या दिशेने जातेय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्या काय घडेल हे आज सांगू शकत नाही. संध्याकाळी सुखरूप घरी परत येऊ की नाही हे सांगू शकत नाही. अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दाभोलकर, गौरी लंकेश हत्याकांडचा उल्लेख करत त्यांनी धर्मांधांची समस्या वाढत आहे. उजव्या विचारसरणीचा धोका वाढत असतो. यातून भविष्यात हिंसा अधिक वाढेल अशी स्थिती असून याबाबतीत सतर्क रहाणे गरजेचे आहे.

न्यायमंदिरात जाण्यासाठीची पहिली पायरी पोलीस स्टेशन आहे. तेथे स्वच्छ मनाने जायचे तर पहिली पायरी स्वच्छ ठेवायला पाहिजे. 80 ते 95 सालापर्यंत हा फार वाईट काळ होता. यामध्ये 18 हजार लोक मेले होते. ज्यामध्ये पोलीस, त्यांचे नातेवाईक यांचा समावेश असल्याचे सांगत वर्क यांनी खेद व्यक्त केला.

आज फार कठीण काळातून आपण जात आहोत. ‘पत्थर की अदालत में शिशे की गवाही है।’, तसेच ‘देर तक रोते रहे मैं और हिंदुस्थान’ अशा शेरोशायरीतूनही त्यांनी यावेळी भारतापुढील सुरक्षिततेची आव्हाने मांडली.

Related posts: