|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » भविष्य » गणेशोत्सवाबाबत काही विचार करण्याजोग्या गोष्टी

गणेशोत्सवाबाबत काही विचार करण्याजोग्या गोष्टी 

 13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबींचा खाली दिलेल्या आहेत, त्यांचे अनुकरण करणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे. काही जण गणपती मूर्ती आवडली म्हणून मोठय़ा आकाराची आणतात, तसे करू नये. गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा जास्त मोठी असू नये. वास्तविक पहाता आपल्या हाताच्या वितीएवढी मूर्ती असावी,असा संकेत आहे. मूर्ती एका क्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेली मूर्ती सर्वोत्तम समजावी. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना तसेच चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नयेत. क्रिकेटर, नटनटय़ा अथवा तत्सम व्यक्तीच्या रुपातील गणपती आणू नयेत. अन्यथा देवाची पूजा करण्यापेक्षा नको त्या निरुपयोगी व धरणीला भर असलेल्यांची पूजा केल्यासारखे होते. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये. कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरुपातच  केली जाते. शास्त्रात शिवपार्वतीची मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळय़ावर पट्टी बांधून घरी आणून गणपतीची जोपर्यंत मंत्रोच्चाराने प्राणप्रति÷ा होत नाही, तोपर्यंत त्या मूर्तीत देवत्व येत नाही. ती फक्त मातीची मूर्ती समजावी. मूर्तीची प्राणप्रति÷ा करण्याअगोदर काही कारणांमुळे मूर्तीला धक्का लागला किंवा भंगल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात दाखवून तिचे त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून विधिवत प्रति÷ापना करावी. मनात कोणतेही भय व आशंका आणू नयेत. काहीजण मूर्ती भंगल्यावर भीती घालून तिचे भांडवल करतात व प्रचंड खर्चाच्या शांती सांगतात. अशा लोकांना अजिबात थारा देऊ नये. कुटुंबात किंवा नात्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास सुतकात असल्याने गणेश पूजन करू नये. त्या ऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकरवी पूजा करून नैवेद्य दाखवावा व मंगलमूर्तीचे विसर्जन करावे. काही अडाणी व सुशिक्षित लोक दरवषी जास्त पैसे घालून गणपतीच्या मूर्तीचा आकार वाढवितात. हे शास्त्र संमत नाही. तसे चुकूनही करू नका. तो गंभीर दोष आहे. दरवषी उंची वाढविल्यामुळे गणपतीची कृपा अधिक  लाभते असे समजणे हा मूर्खपणाचा कळस आहे. गणेशाची प्रति÷ापना झाल्यावर घरात वादविवाद, मद्य व मांसाहार अजिबात करू नये. मंगलमूर्तीचे पावित्र्य भंग झाल्यास पुढे त्याचे फटके बसतात. शेतकरी व काही समाजात गणपतीच्या दुसऱया दिवशी उंदरी साजरी करून मांसाहार करतात. ही प्रथा पूर्णपणे चुकीची आहे. ती त्वरित बंद होणे गरजेचे आहे. गणपतीला साधा भाजी भाकरीचा रोज नैवेद्य दाखविला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. कोकणात व उत्तर कर्नाटकात गौरी सणात गौराईला मटणाचा नैवेद्य दाखविला जातो. ही अत्यंत विकृत प्रथा आहे. गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे. तिचा अपमान करू नका. गणपतीचे जितके पावित्र्य व मांगल्य पाळाल तितके त्याचे चांगले अनुभव येतात. अन्यथा पुढे ज्यावेळी त्याचे दुष्परिणाम दिसू लागतील, त्यावेळी वेळ गेलेली असेल हे लक्षात ठेवावे.

(पहिला भाग)

 

मेष

सहाव्या स्थानी शुक्र आहे. हा योग चांगला नाही. नोकरी वगैरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याची शक्मयता आहे. कोणतेही जीवघेणे धाडस करू नका. वेळ सांगून येत नाही. किरकोळ चुकांमुळे मनस्तापाचे योग, आर्थिक हानी. या काळात अन्नदान करावे. कुलदेवतेची आराधना चालू ठेवा. त्यामुळे कितीही संकटे आली तरी त्यातून सुटका होईल. नवे व्यवहार सुरू होतील.


वृषभ

सर्व कामात अनेकांचे सहकार्य मिळेल. मोठय़ा प्रमाणात धनलाभ होईल. संततीप्राप्तीचे योग. नोकरी व्यवसायात बदलीचे योग. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. पण शनि, मंगळाच्या कुप्रभावामुळे वैवाहिक जीवनात नवनव्या समस्या येत राहतील. पती पत्नीने एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करावा. कुणाच्याही दोषावर बोट ठेवू नका. आपोआपच परिस्थिती निवळेल.


मिथुन

राशीस्वामी बुध शापीत योगात आहे. त्यामुळे कोणतेही काम वेळेवर पार पडणार नाही. मन शांत ठेवून चार चौघांचा सल्ला घेऊनच महत्त्वाच्या वाटाघाटी करा. कुणाच्या तरी पुण्याईने कुटुंबात शुभ कार्ये घडतील. शनि, मंगळाचा प्रभाव वाढणार आहे. नोकरी व्यवसायात त्रास, नको ती जबाबदारी वाढेल. इतरांना वाचविण्यास जाऊन स्वत: पोलीस केसीसमध्ये अडकाल.


कर्क

वडीलधाऱयांशी मतभेद होऊ देऊ नका. शापीत योग आहे. त्यामुळे सर्व बाबतीत सांभाळा. शनि, मंगळाच्या प्रभावाने शारीरिक आजाराना प्रोत्साहन मिळेल. अपघात, आजार, गंडांतरे, मानसिक त्रास होत असल्याने व्यसन व इतर अनिष्ट बाबीकडे मन वळेल. सांभाळावे. गुरु शुभ असल्याने जागा व कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.


सिंह

एखादे न होणारे काम होऊन जाईल, पण तुमचे प्रयत्नही आवश्यक. पंचमातील शनिमुळे संतती दोष व कुटुंबात ताणतणावाचे वातावरण राहील. गैरसमज निर्माण करणारे ग्रहमान आहे. तुमच्या कामाचे फळ मिळेलच असे नाही. कुणीतरी नको ती जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करतील. आहे ती नोकरी अथवा व्यवसाय चुकूनही बदलू नका. कारण नसताना दुरुस्तीची कामे काढू नका.


कन्या

चंद्र, हर्षलचा अनिष्ट योगामुळे नको त्या विचारांचा प्रभाव वाढणार आहे. शेजारीवर्गाशी काही कारणाने तेढ निर्माण होईल. प्रवासात बाधा व शारीरिक धोका निर्माण करणारे ग्रहमान आहे. यासाठी वाहनवेगावर नियंत्रण ठेवा. पिकनिक अथवा नवख्या ठिकाणी जाताना बाधिकपणाचा संशय आल्यास काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत.


तुळ

चंद्र,हर्षल प्रतियोगामुळे काही महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. आर्थिक भरभराटीच्या दृष्टीने सुवर्ण संधी मिळेल. सतत काही ना काही लाभ होत राहतील. किंवा नोकरीत पगारवाढ, व्यवसायात उर्जितावस्था येईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. आतापर्यंत न झालेली एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.


वृश्चिक

आठवडय़ाची सुरुवात कालसर्पयोगाने होत आहे. हा शापीत योग असल्याने कुणाशीही बोलताना वागताना अतिशय काळजी घ्या. पण आर्थिक लाभाच्या बाबतीत चांगला काळ. पूर्वी केलेल्या कष्टाचे फायदे मिळतील. पैसाअडका, मानसन्मान, आरोग्यात सुधारणा, विवाह, नोकरी, व्यवसाय या सर्व बाबतीत अनुकूल योग. काही जुनी येणी वसूल होतील.


धनु

बुध, राहू व मंगळ केतुच्या शापीत योगात तुमची रास अडकलेली आहे. हा प्रखर शापीत दोष असतो. त्यामुळे जरा सावधानतेने वागल्यास चांगले. काही महत्त्वाच्या कामांची सुरुवात धार्मिक कार्याने होईल. दैवी सहाय्य मिळण्याची शक्मयता आहे. तुमच्या घरात व्रतवैकल्ये सुरू असतील, कुलदेवाचा कुलाचार व्यवस्थित चालू असेल तर हा आठवडा तुम्हाला सर्व बाबतीत यश देणारा आहे.


मकर

नवीन व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल. रवि सप्तमात आहे. कोर्टमॅटर व सरकारी धनलाभ व व्यवसाय व आरोग्याच्या बाबतीत चांगली प्रगती होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. विवाहाच्या वाटाघाटीना यश मिळेल. प्रवासाच्या संधी येतील. काही जुने व्यवहार पूर्ण करू शकाल. कौटुंबिक  वातावरणात जरासा  फरक जाणवेल. कामाचे स्वरुप बदलल्यास अनेक महत्त्वाच्या समस्या मिटतील.


कुंभ

सप्तमाधिपती रवि बलवान आहे. भागीदारी व्यवसायास अनुकूल काळ. तसेच वैवाहिक जीवनातील समस्या मिटतील. नोकरी व्यवसाय, लिखाण, देणीघेणी महत्त्वाच्या वाटाघाटी व नातेसंबंधात काही चांगल्या घटना घडतील. धनलाभ व थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. नवीन मैत्री जोडण्यास चांगला काळ. अनावश्यक मोह मात्र टाळावा लागेल.


मीन

मंगळ केतूच्या सहकार्याने भाग्योदयकारक घटना घडतील. मूळ कुंडलीत लाभात मंगळ, केतू असतील तर हा आठवडा तुम्हाला  लाभदायक ठरेल. नोकरीत अविस्मरणीय घटना घडतील. त्याचे अनुभव दोन तीन महिन्यात येतील. तरुण तरुणींनी प्रेमप्रकरणात सावधानता बाळगावी. फसवणूक वगैरेची शक्मयता आहे.