|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेहुल चोक्सीचे भारतावरच आरोप

मेहुल चोक्सीचे भारतावरच आरोप 

निर्दोष असल्याचा केला कांगावा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रूपयांचा चुना लावून पळालेल्या मेहुल चोक्सी याने आता भारतावरच आरोप करण्यास प्रारंभ केला आहे. अँटिग्वा येथे सध्या त्याचे वास्तव्य असून त्याने सर्व आरोप नाकारले आहेत.

बँक घोटाळा बाहेर पडल्यापासून प्रथमच त्यांनी मंगळवारी टीव्ही माध्यमातून त्याचे वक्तव्य दिले. सीबीआय व ईडी यांनी आपल्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई चालविली आहे. आपण निर्दोष असून कोणालाही फसवलेले नाही. आपल्या विरोधात काढलेली रेड कॉर्नर नोटीस बेकायदेशीर आहे. भारतात आपली मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. ही जप्तीही बेकायदेशीर आहे. बँक घोटाळय़ाला मी जबाबदार नसून बँक अधिकारी उत्तरदायी आहेत. त्यामुळे त्यांचीच चौकशी झाली पाहिजे, असे विविध आरोप त्याने केले.

परतण्यास नकार

भारताने माझे पारपत्र (पासपोर्ट) रद्द केलेले आहे. त्यामुळे मी भारतात आता परतू शकत नाही. मी अँटिग्वाचा नागरीक आहे. पण भारताने पारपत्र रद्द केल्याने मला याच देशात अडकून पडावे लागले आहे. भारताने आपली मालमत्ता आणि पारपत्र परत द्यावे, अशा विविध मागण्याही त्याने केल्या. त्याच्याविरोधात इंटरपोलने नोटीसा बजावलेल्या आहेत. अँटिग्वाहून त्याला येथे परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Related posts: