|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय क्रिकेटपटूंची वेतनश्रेणी जाहीर

भारतीय क्रिकेटपटूंची वेतनश्रेणी जाहीर 

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱया वेतनश्रेणी आणि मानधन रकमेची यादी बीसीसीआयने अधिकृतपणे घोषित केली आहे. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवि शास्त्राr, रोहित शर्मा व अन्य भारतीय क्रिकेटपटूंबरोबर भारतीय क्रिकेट मंडळाने नवा करार केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा बुधवारी संपणार आहे. भारतीय संघ मायदेशात दाखल होण्यापूर्वीच बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या मानधनाची यादी घोषित केली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने क्रिकेटपटू, प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षकवर्ग तसेच बाहेरील एजन्सी बरोबर गेल्या ऑगस्टमध्ये चर्चा केली होती. त्यानंतर क्रिकेटपटूंची श्रेणी जाहीर करण्यात आली. क्रिकेटपटूंच्या मानधन यादीमध्ये कर्णधार कोहली पहिल्या स्थानावर आहे.

विराट कोहलीची 65, 06, 808 रूपयांची मिळकत असून त्यामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱयातील कसोटी मालिकेसाठी सामना मानधनाचा समावेश आहे. या दौऱयातील वनडे मालिकेसाठी कोहलीला 30, 70, 456 रूपये मानधन म्हणून मिळाले आहे. आयसीसीकडून कसोटी मानांकन बक्षीस रकमेतील त्याची 29, 27, 700 रूपयांची आहे.