|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवसमर्थ सोसायटीच्या एटीएम सुविधेचे उद्घाटन

शिवसमर्थ सोसायटीच्या एटीएम सुविधेचे उद्घाटन 

वार्ताहर/ जोतिबा डोंगर

श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑप पेडीट सोसायटी लि., या संस्थेच्या जोतिबा डेंगर शाखा येथे ‘मिनी एटीएम सुविधेचे’ उद्घाटन श्रींचे पुजारी तसेच गुरुजी सूरज उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पी. व्ही. गुरव व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. जनार्दन बोत्रे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पी. व्ही. गुरव म्हणाले, डिजीटल इंडिया संकल्पनेला अनुसरुन शिवसमर्थने राबविलेली ‘मिनी एटीएम सुविधा नाविन्यपूर्ण आणि फायदेशीर आहे तसेच 365 दिवस 12 तास सेवा देत असणाऱया शिवसमर्थने मिनी एटीएम सुविधा राबवून ग्राहकाच्या सेवेत आणखी भर टाकली आहे.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. जर्नादन बोत्रे या प्रसंगी बोलताना म्हणाले, जोतिबा डोंगराच्या पावन भुमीत भक्तांची, ग्रामस्थांची बँकेमार्फत सेवा घडते से आमचे भाग्य आहे. प्रास्ताविक संजय जांभळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. प्रचित यादव, ग्रामपंचायत लिपीक मिलींद शिंगे, युवराज माने, संतोष देसाई, अमर संकपाळ, शहाजी शिंदे आणि जोतिबा शाखेचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे ग्राहक, सभासद, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: