|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शॉर्टसर्किटने साडेतीन एकरातील ऊस जळाला

शॉर्टसर्किटने साडेतीन एकरातील ऊस जळाला 

वार्ताहर/ बेडकिहाळ

शमनेवाडी-सदलगा मार्गावरील सवदे मळा परिसरात विद्युत तारांचा ऊस पिकाला स्पर्श झाल्याने 3 एकर 30 गुंठय़ातील पीक खाक झाल्याची घटना 10 रोजी दुपारी 1 च्या दरम्यान घडली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती मिळालेली अशी, शमनेवाडी-सदलगा हद्दीतील भूषण किरण खोत स. नं. 597/7 यांचा 1 एकर 20 गुंठे, महावीर भूपाल खोत स. नं. 597/2 मधील 1 एकर 5 गुंठे व अरविंद भूपाल खोत स. नं. 597/2 मधील 1 एकर 5 गुंठे असा एकूण 3 एकर 30 गुंठे उसाच्या फडाला अचानक विद्युत तारांच्या स्पर्श झाला. त्यामुळे आग लागल्याचे येथील शेतकऱयांकडून समजते. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकऱयांनी प्रयत्न केले. पण त्यांना त्यात अपयश आले. घटनास्थळी सदलगा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. या घटनेत 265 व 8603 जातीचा सुमारे 250 टन ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी हेस्कॉमचे अधिकारी, सदलगा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस यांच्यासह महावीर खोत, अरविंद खोत, भूषण खोत, रावसाब खोत यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.