|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Top News » कोरेगाव-भीमा प्रकरण : पाचही आरोपींना नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम

कोरेगाव-भीमा प्रकरण : पाचही आरोपींना नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरेगाव भीमा प्रकरणातील पाचही आरोपींच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. पाचही आरोपींची नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईल.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला होता.

Related posts: