|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » नालासोपारा स्फोटकप्रकरण : जालन्यातून एक ताब्यात

नालासोपारा स्फोटकप्रकरण : जालन्यातून एक ताब्यात 

ऑनलाईन टीम / जालना :

ज्नालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने जालन्यातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गणेश कपाळे असे त्याचे नाव असून कपाळेचा जालन्यात झेरॉक्सचे दुकान आहे.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्टमध्ये नालासोपारा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतसह पाच कट्टरवाद्यांना शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील(यूएपीए) विविध कलमांनुसार अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार नंतर सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरला आणि शरद कळसकरला अटक करण्यात आली होती.पांगारकर हा देखील जालन्याचा आहे. एटीएसने बुधवारी सकाळी जालन्यातून गणेश कपाळेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरु आहे. कपाळेचे जालन्यातील कचेरी रोड येथे झेरॉक्सचे दुकान आहे.

 

Related posts: