|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लेबनॉन : महिलांसाठी स्वतंत्र ‘बीच’

लेबनॉन : महिलांसाठी स्वतंत्र ‘बीच’ 

क्षेत्रात प्रवेश केल्यास पुरुषांना भरावा लागतो दंड

बैरुत

 लेबनॉनच्या जियेह शहरात केवळ महिलांनाच जाण्याची अनुमती असणारा सागरी किनारा तयार केला आहे. या बीचवर महिलांना हिजाब परिधान करणे बंधनकारक नाही. या बीचवर महिलांसाठी सूर्यस्नान, बिकिनी परिधान करण्यासारख्या सुविधा देखील आहेत. तर बीचनजीक एक रिझॉर्ट निर्माण करण्यात आले आहे. कोणताही पुरुष या बीचवर दाखल झाल्यास त्याला 18 डॉलर्सचा दंड भरावा लागतो.

लेबनॉनमध्ये मुस्लीम महिलांना पतीखेरीज कोणत्याही पुरुषासमोर तोकडय़ा कपडय़ांमध्ये वावरण्याची अनुमती नाही. कुटुंबासोबत पिकनिकसाठी गेलो तरीही आम्हा महिलांना तीव्र उन्हात हिजाब,  परिधान करावे लागायचे असे एका महिलेने सांगितले.

मोबाईल-कॅमेऱयास मज्जाव

तुम्ही दृढ निश्चय केल्यास काहीही प्राप्त करू शकता. या बीचवर आल्यावर आम्ही वेगळेच जीवन जगतो. परंतु येथे काढली गेलेली छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची अनुमती नाही. याचमुळे बीचवर कॅमेरा किंवा मोबाईल नेऊ दिला जात नाही. या बीचवर महिला केवळ 8 वर्षांपर्यंतच्या मुलाला सोबत नेऊ शकतात असे नादा या महिलेने सांगितले.