|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी त्यागी यांना जामीन

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी त्यागी यांना जामीन 

नवी दिल्ली

 3600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार घोटाळय़ातील आरोपी माजी वायूदलप्रमुख एस.पी. त्यागी यांना मोठा दिलासा मिळाला. दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने त्यागी आणि त्यांच्या दोन भावांना बुधवारी जामीन मंजूर केला. तर याप्रकरणी न्यायालयात उपस्थित न राहणाऱया आरोपींना मात्र जामीन मिळू शकलेला नाही. या घोटाळय़ाप्रकरणी ईडीने अगोदरच एक आरोपपत्र दाखल केले आहे. यात दुबई येथील एका कंपनीवर आरोप ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली असून यात हेलिकॉप्टर व्यवहारासाठी अवैध मार्गाने पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप देखील सामील आहे.  त्यागी, निवृत्त एअर मार्शल जे.एस. गुजराल समवेत अन्य 7 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. यात 3600 कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी 423 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप नमूद आहे.

Related posts: