|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसामला भूकंपाचा धक्का, जिवीत हानी नाही

आसामला भूकंपाचा धक्का, जिवीत हानी नाही 

लंडन / वृत्तसंस्था

ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या कोक्राझार येथे 5.5 रिष्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बुधवारी बसला आहे. याचे पडसाद ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, अरूणाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये उमटले आहेत. तथापि, यात कोणतीही जिवीत हाती झाली नसल्याचे सांगण्यात आले. केवळ काही इमारतींची पडझड झाल्याचे वृत्त असून आता जनजीवन सामान्य झाले आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या भूकंपाचे केंद्र भूमीखाली आठ ते दहा किलोमीटरवर होते, अशी माहिती भूकंपमापन केंद्राकडून देण्यात आली.

Related posts: