|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राष्ट्रपती दौऱयासाठी माध्यम केंद्राची स्थापना

राष्ट्रपती दौऱयासाठी माध्यम केंद्राची स्थापना 

प्रतिनिधी / बेळगाव

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दि. 15 रोजी बेळगावात येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्नाटक लॉ सोसायटीचा अमृतमहोत्सवी समारंभ होणार आहे. या समारंभाकरिता स्थापन करण्यात आलेल्या माध्यम केंद्राचे उद्घाटन जी. आय. टी येथे बुधवारी सकाळी करण्यात आले.

कर्नाटक लॉ सोसायटीचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी सोसायटीचे संचालक आर. एस. मुतालिक देसाई सेपेटरी ए. के. तगारे आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना राष्ट्रपतींच्या दौऱयासंदर्भातील तपशील सादर करण्यात आला. तसेच रहदारी नियोजनाचा आराखडा सादर करण्यात आला. जी. आय. टी. संस्थेच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल वजुभाई वाला, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, राज्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयातील न्या. मोहन शांतनगौडर, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. विनीत सरन, भारताचे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.