|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरूणीवर गँगरेप

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरूणीवर गँगरेप 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

देश पुन्हा एकदा गँगरेपने हादरला आहे. हरियाणात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वषीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित तरुणीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले होते. इतकंच नाही तर 26 जानेवारी 2016 रोजी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. दुर्दैव म्हणजे पोलिसांनी पुन्हा एकदा हद्दीचा मुद्दा उपस्थित करत पीडित कुटुंबाला मानसिक त्रास दिला.

 

पीडित तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयार करते. त्यासाठी ती क्लासला जात होती, त्यावेळी गावातीलच तीन जण पंकज, मनीष आणि निशू यांनी तिचे अपहरण केले. या तिघांनी तरुणीला महेंद्रगढ आणि झज्जर जिह्याच्या सीमेवरील शेतात, एका विहिरीजवळ घेऊन गेले. तिथे आणखी काही नराधम आधीच हजर होते. दारुच्या नशेत असलेल्या 12 जणांनी मुलीच्या शरिराचे अक्षरशः लचके तोडले.

 

या सर्व पाशवी कृत्यानंतर नराधमांनी दुपारी चारच्या सुमारास पीडित तरुणीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पोबारा केला. संतापाचा कळस म्हणजे आरोपी नराधमांपैकी एकाने पीडित तरुणीच्या घरी फोन करुन, तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याचं सांगितलं. या फोननंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, समोर जे चित्र होतं, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

 

पीडित कुटुंबाने याबाबतची तक्रार रेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्मया आवळण्याऐजी, कुटुंबाला हद्दीचे कारण दिलं. त्यांना महेंद्रगढमधील कनीना ठाण्यात खटला दाखल करण्यास सांगितलं. तिकडे गेल्यावर कनीना पोलिसांनीही ती हद्द आमची नसल्याचे सांगत, परतवून लावले.

 

Related posts: