|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » पाच लाखांसाठी सासरच्यांकडून महिलेचा खून

पाच लाखांसाठी सासरच्यांकडून महिलेचा खून 

ऑनलाईन टीम / हिंगोली :

पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा गळा दाबून हत्या केल्याची घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्मयात घडली आहे. हत्या केल्याचा संशय येऊ नये यासाठी तिचा मृतदेह लटकवण्यात आला. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वसमतमधील गुलशननगर भागात 13 सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सलमा बेगम अब्दुल रहमान (वय 28 वर्ष) लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.

 

मृत सलमा बेगम यांचे वडील मोहम्मद खलील महम्मद शिकूर (वय 48 वर्ष) यांच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींचा व्यवसाय वाढवण्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांची मागणी करत होते. पण मागणी पूर्ण न झाल्याने सासरची मंडळी कायम सलमा बेगमचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यानंतर 13 तारखेला त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. हत्येचा संशय येऊ नये यासाठी तिने आत्महत्या केल्याचं दाखवण्यासाठी सासरच्या लोकांनी मृतदेह लटकवला.

 

Related posts: