|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटणाऱया दोघांना अटक

गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटणाऱया दोघांना अटक 

रेल्वे पोलिसांची कारवाई

6 लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी पोलीस घेणार ताबा

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशाना खाण्याच्या पदार्थामधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱया दोघा संशयित आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े बसारत नूर हुसेन (50), मोहमद साफी (35) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 5 लाख 77 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान अशा प्रकारे लुट केल्याचा गुन्हा रत्नागिरी पोलिसांकडे देखील दाखल असल्याने या संशयितांचा ताबा रत्नागिरी पोलिसांकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े

कोकण रेल्वेमार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱया प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना अलिकडे समोर येत होत्य़ा पनवेल पोलीस ठाण्यात तीन, कल्याण रेल्वे पोलिसांत तीन आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होत़ा त्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरून मडगाव ते ठाणे असा प्रवास करणाऱया मुहम्मद फैसल जमाल खान (22, ऱा घाटकोपर, मुंबई) यांना खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध देवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली होत़ी त्यांच्याजवळील 12 हजार 500 रूपयांचा ऐवज व कागदपत्रे असलेली बॅग चोरीला गेली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा दरम्यान या गुह्यांचा तपास करत असताना पश्चिम बंगालमधील या दोघा संशयितांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, कोकणमार्गे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राज्यात मेल-एक्सप्रेसने जाणाऱया रेल्वे प्रवाशांचा विश्वास संपादन करून ही टोळी लूट करत होती. पनवेल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. या आरोपींनी व्यापारी असल्याचे भासवत मत्स्यगंधा एक्स्प्रेसने जाणाऱया प्रवाशांना लुटले होते. व्हॉट्सऍपवर सबक्राईब करा, या प्रकरणामध्ये आरोपींनी कल्याण स्थानकातून रेल्वे तिकीट काढल्याचे तपासात समोर आले होते.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास करताना हे आरोपी एका लॉजमध्ये थांबल्याचे समोर आले. त्या लॉजमध्ये तपास केल्यानंतर त्या आरोपींचा मोबाईल नंबर आणि त्यावरून मूळ पत्ता सापडला. त्या आधारे रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुह्याची कबुली दिल़ी त्यानुसार मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱया लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांशी जवळीक साधून बिस्कीटे, थंड पेय, जेवण आणि चहामधून गुंगीचे पदार्थ देऊन त्यांना बेशुध्द केले जात होते.