|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकऱयांचा विरोध

बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकऱयांचा विरोध 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट टेनला आता गुजरातमधील शेतकऱयांनीही विरोध केला आहे. बुलेट टेनच्या प्रकल्पाविरोधत जवळपास एक हजार शेतकऱयांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात धव घेतली. बुलेट टेनसाठीच्या भूसंपादनाला या शेतकऱयांचा विरोध आहे.

यासंदर्भात, मुख्य न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांच्या खंडपीठात जमीन अधिग्रहणास आव्हान देणाऱ्या 5 याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याशिवाय विरोध करणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र प्रतिष्ठापत्र दाखल करुन केंद्राच्या या महत्वाकांक्षी 1.10 लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे अनेक शेतकरी प्रभावित झाले असून आम्ही त्याचा विरोध करतो असे म्हटले आहे.

 

Related posts: