|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » इंदापूरचा पाणीप्रश्न पेटला, पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

इंदापूरचा पाणीप्रश्न पेटला, पुणे-सोलापूर महामार्ग रोखला 

ऑनलाईन टीम / बारामती :

माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या पाणीप्रश्नावरुन आक्रमक रुप धारण केले आहे. इंदापूर तालुक्मयाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुका काँग्रेसने हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्त्वात रास्ता रोको आंदोलन केले.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे इंदापूर तालुक्मयात ऊसाची पिके, फळबागा, भाजीपाला व जनावरांचा चारा यांसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्मयातील सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहे. शेजारीच असलेल्या बारामती आणि दौड तालुक्मयात खडकवासला व भाटघर धरणाचे पाणी कालव्यातून मिळाले. मात्र इंदापूर तालुक्मयाला हक्काचे पाणी मिळाले नसल्याच्या कारणाने आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पळसदेव या गावी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून ठेवला होता. पाणीप्रश्नावरील काँग्रेसच्या या आंदोलनाला तालुक्मयातील जनतेने मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद दिला. मोठा जनसमुदाय या आंदोलनात सहभागी झाला होता. निष्क्रीय आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळे तालुक्मयावर ही वेळ आली असल्याचा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आणि खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडून तालुक्मयातील 27 पाझर तलाव भरावेत, अशी मागणी केली. आंदोलनावेळी निवेदन स्वीकारण्यास आलेल्या पाटबंधारेच्या अधिकाऱयांना आंदोलकांनी चांगलेच कोंडीत पकडले होते आणि पाणी का सोडत नाही, याचा जाब संतप्त आंदोलकांनी विचारला.