|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर

चंदन, कासव तस्करीप्रकरणी संशयितांचा जामीन नामंजूर 

प्रतिनिधी / ओरोस:

 चंदन व कासव तस्करीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वेंगुर्ले येथील सुरेश जयराम पवार (45), चंदू जयराम पवार (37), शिवाजी तुकाराम पवार (28), राजू अर्जून पवार (28) यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी नामंजूर केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.

 चंदन लाकूड व कासव प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी टाकलेल्या धाडीत वेंगुर्ले म्हाडा कॉलनी येथील गावडे यांच्या घरी अवैध चंदन लाकडाचा साठा आढळून आला होता. तसेच वानरमारे वसाहतीत नऊ जिवंत कासवे आढळून आले होते.

याप्रकरणी भारतीय वन अधिनियम, वन्यजीवसंरक्षण आणि जैवविविधता अधिनियम इत्यादी नुसार एकूण 18 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी काहींना 10 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. यामध्ये वरील चारही संशयितांचा समावेश होता. वेंगुर्ले न्यायालयाने त्यांना 19 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली होती. न्यायालयीन कोठडीतील या चारही संशयितांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज सादर केला होता.

Related posts: