|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गाईच्या दुधाला कमी दर देऊन लाटला मलिदा

गाईच्या दुधाला कमी दर देऊन लाटला मलिदा 

वार्ताहर/ सडोली खालसा

गोकुळ दूध संघावर कोल्हापूर जिह्याची मालकी रहावी अशी दूध उत्पादकांची मानसिकता आहे. यामुळे गोकुळ मल्टिस्टेटच्या ठरावाला दूध उत्पादक सभासदांतून तीव्र विरोध होत आहे. हा ठराव झाल्यास जिह्यातील प्राथमिक दूध संस्थाना काडीचीही किंमत राहणार नाही. तर उत्पादकांचे हित कोण बघणार, असा सवाल करत गोकुळ दूध उत्पादकाच्या हिताकडे दुर्लक्ष झाले तर सत्तेतून बाजूला होतो म्हणणारे पी. एन. पाटील शासनाचा आदेश डावलून गाईच्या दुधाला कमी दर देण्याच्या निर्णयावर गप्प का? प्रतिलिटर वीस रूपये प्रकिया खर्च करून संचालक मंडळासह नेते मंडळीही गोकुळचा मलिदा चाखत आहेत, असा घणाघाती आरोप आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.

आरे (ता. करवीर)येथील व्यायाम शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. यावेळी आमदार नरके म्हणाले, मल्टिस्टेट केल्यानंतर किती सभासद वाढ करता येते. कालपर्यंत परराज्यातील पाच सभासद करणार असे म्हणणारे आज 165 सभासद वाढवण्याची भाष्य करत आहेत. हा ठराव झाल्यास दोन हजार सभासद वाढवून सत्ताधारी दूध संघ कायमचा ताब्यात ठेवतील. दूध उत्पादक शेतकऱयांची मानसिकता दूध संघावर कोल्हापूर जिल्हाची मालकी रहावी अशी आहे. यासाठीच या ठरावाला दूध उत्पादक सभासदांतून विरोध होत आहे. हा ठराव झाला तर जिह्यातील प्राथमिक दूध संस्थाना काडीचीही किंमत राहणार नाही. गोकुळ दूध उत्पादकांच्या हिताकडे दुर्लक्ष झाले तर गोकुळच्या सत्तेतून बाजूला होतो म्हणणारे पी. एन. पाटील शासनाचा आदेश डावलून गाईच्या दुधाला कमी दर देण्याच्या निर्णयावर गप्प का? प्रतिलिटर वीस रूपये प्रकिया खर्च करून संचालक मंडळासह नेते मंडळीही गोकुळचा मलिदा चाखत आहेत. सत्तेवर असलेल्या राज्य सरकारशी साठे लोटे असते आताही भाजपचे प्रतिनिधी संचालक मंडळात आहेत. पण सभासद हिताचा देखावा करून राज्य शासनाच्या तरतुदीमुळे गोकुळ मल्टिस्टेट करावा लागत असल्याचे सागत आहेत, हा डाव दूध संस्था प्रतिनिधींनी हाणून पाडावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी संपतराव पवार पाटील म्हणाले, जिह्यातील मल्टीस्टेटचा निर्णय दूध उत्पादक सभासदांसाठी घातक आहे. डेअरीला दोन लिटर ही दूध न घालणारे संचालक म्हणून मिरवत आहे. गोकुळ शॉपीतील 71 लाखांची प्राथमिक चौकशीही पूर्ण केलेली नाही. गोकुळ मल्टीस्टेट करून सामान्य दूध उत्पादकाची लोकशाही प्रणाली मोडीत काढण्याचा घाट घातला आहे हा डाव मोडीत काढा. दरम्यान बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंभीचे संचालक किशोर पाटील, अशोकराव पवार पाटील, नामदेवराव पाटील, हंबीरराव पाटील, माजी संचालक विश्वास वरूटे, बबन पाटील, उदय चव्हाण, चंद्रकांत मेटील, युवराज जाधव, महादेव पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत महेश वरूटे यांनी तर आभार माजी संरपच रमेश वरूटे यांनी केले.

Related posts: