|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रणझुंजार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर

रणझुंजार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर 

वार्ताहर/ ल्हासुर्णे

रणझुंजार सार्वजनिक ट्रस्ट ल्हासुर्णे (ता. कोरेगांव) यांनी मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये ल्हासुर्णे गावातील तरुणांनी त्याचबरोबर प्रतिष्ठीत नागरीकांनीदेखील सहभाग घेतला होता. येथील या रक्तदान शिबिरामध्ये 250 नागरिकांनी रक्तदान केले. यामध्ये रणझुंजार ट्रस्टच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी मोठय़ा प्रमाणात या शिबिरामध्ये सहभाग घेतला.

यावेळी ल्हासुर्णे गावच्या सरपंच सौ. उबाळे, तलाठी एस. डी. काटकर, किसनराव सावंत, जगन्नाथ कुंभार, प्रकाश सावंत, रणझुंजार ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार त्याचबरोबर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.