|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डॉ.अमेय स्वार यांना सुवर्णपदक प्रदान

डॉ.अमेय स्वार यांना सुवर्णपदक प्रदान 

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडीचे सुपुत्र डॉ. अमेय अजय स्वार यांनी डीएनबी ऑर्थो परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकाविला होता. राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या पदवीदान समारंभात त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अमेय स्वार यांनी पुणे येथील मायनर कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. तर संचेती हॉस्पिटल येथून डी. ऑर्थो. केले. डीएनबीच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत त्यांनी देशात पाचवा क्रमांक मिळविला होता. बांद्रा-मुंबई येथील के. बी. भाभा हॉस्पिटलमधून डीएनबी ऑर्थो पदवी संपादन केली होती. राष्ट्रीय बोर्डाने डीएनबी ऑर्थोच्या डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या परीक्षेतील त्यांच्या यशाबद्दल डॉ.  बालू शंकर सुवर्णपदकासाठी त्यांची निवड केली. राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या 24 सप्टेंबरला झालेल्या 19 व्या पदवीदान समारंभात डॉ. अमेय यांना सुवर्णपदक
प्रदान करण्यात आले. डॉ. अमेय हे येथील प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अजय स्वार आणि डॉ. अमृता स्वार यांचे सुपुत्र आहेत.

Related posts: