|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्जमाफी, ऊसबिले आणि वाळू समस्या तातडीने सोडवा

कर्जमाफी, ऊसबिले आणि वाळू समस्या तातडीने सोडवा 

प्रतिनिधी/ बेळगाव

संपुर्ण कर्जमाफी, ऊसबिल, वाळु समस्या सोडविण्यासाठी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. शेतकऱयांची ऊस बिले अनेक साखर कारखान्यांनी दिली नाहीत. ती बिले तातडीने द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.

जिह्यातील सतीश शुगर्स, रेणूका शुगर्स आणि धनलक्ष्मी साखर कारखान्यांसह इतर साखर कारखान्यांनी ऊस बिले देणे बाकी आहे. ऊस बिल मिळाली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आता पुन्हा गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. तरी देखील मागील दोन वर्षांची बिले अद्याप देण्यात आली नाहीत. यामुळे शेतकऱयाला जीवन जगणे कठीण झाले असून साखर कारखान्यांतील बाकी तातडीने द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

सरकारने कर्जमाफी केल्याचे जाहीर केले तरी अजूनही संपूर्ण कर्जमाफी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तेंव्हा शेतकऱयांची कर्जमाफी करण्याची तातडीचे आदेश द्यावेत. त्यामुळे शेतकऱयांना नवीन कर्ज घेणे सोपे जाणार आहे. जिह्यामध्ये वाळुची समस्या गंभीर बनत चालली आहे. गोकाक तालुक्मयात वाळू मिळणे कठीण झाले आहे. तेंव्हा तातडीने वाळू उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रयत संघटनेचे अध्यक्ष गणेश ईळगेर, हणमंत बिळ्ळूर, सिध्दलिंग बिळ्ळूर, लक्ष्मण पाचापूर, भीमसी गदाडी, विठ्ठल लंगोटी, विठ्ठल मेळवंकी, मारुती बिल्लूर, कुमार तिगडी, नागाप्पा कपरट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.