|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे लोकार्पण 

ऑनलाईन टीम / गंगटोक :

पंतप्रधन नरेंद्र मोदींनी सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे लोकार्पण केले आहे. यावेळी मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी मोदी कालच गंगटोकमध्ये दाखल झाले होते. त्याआधी त्यांनी झारखंडमधील रांची येथे आयुष्यमान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केला.

 

आज पंतप्रधन मोदी सिक्कीम दौऱयावर आहेत. त्यांनी सकाळीच राज्यातील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण केलं. या विमानतळाचं काम 2009 मध्ये सुरू झालं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास 9 वर्षांचा कालावधी लागला. सिक्कीममधील पहिले विमानतळ राजधनी गंगटोकपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ 201 एकरवर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आले आहे.