|Monday, May 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » त्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या

त्रिंबक येथे प्रौढाची गळफासाने आत्महत्या 

वार्ताहर / आचरा:

त्रिंबक-देऊळवाडी येथील मंगेश श्रीधर घाडीगावकर (55) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराशेजारील मांगरामध्ये आढळून आला. त्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास घराशेजारील मांगरात वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली असून दारुच्या नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

त्रिंबक-देऊळवाडी येथे मंगेश घाडीगावकर हे तीन भाऊ आणि दोन मुलांसह राहत होते. दीड वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. सोमवारी रात्री  साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून भाऊ सुहाससोबत झोपले होते. पहाटे सुहासला जाग आल्यावर मंगेश हे झोपलेल्या जाग्यावर न दिसल्याने शोध घेतला असता घरालगतच्या मांगराच्या दारात बॅटरी पेटत असल्याचे दिसून आले. सुहास घाडीगावकर हे पुढे पाहण्यासाठी गेले असता मंगेश हे मांगराच्या वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत दिसून आले. पायाखाली लाकडी टेबल आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पोलीस पाटील सीताराम सकपाळ यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली. मंगेश घाडीगावकर यांच्या पश्चात तीन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related posts: