|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ग्रीन हबतर्फे मेट्रोऐवजी एलआरटीची मागणी

ग्रीन हबतर्फे मेट्रोऐवजी एलआरटीची मागणी 

पुणे / प्रतिनिधी :

 मेट्रो प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट होऊ लागला आहे. कोटय़वधी खर्चून मेट्रो उभारण्यापेक्षा एलआरटीचा पर्याय स्वस्त असल्याचे ग्रीन थंबचे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी म्हटले आहे.

एलआरटी हा पर्याय अवघ्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत उपलब्ध होऊ शकणारा आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज सर्पोद्यान, मुठा उजवा पॅनल ते खडकवासलापासून थेऊरपर्यंत या दोन मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एलआरटी टाकण्यात यावी, अशी मागणी ग्रीन थंब पर्यावरण संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

Related posts: