|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » पुणे पोलिसांनी देशविरोधी कट उघड केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे पोलिसांनी देशविरोधी कट उघड केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवडय़ांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय या पाच जणांना जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.

 

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पोलिसांची कारवाई ही कोणत्याही राजकीय दृष्टीकोनातून नव्हती हे सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झालं आहे, असं ते म्हणाले.पुणे पोलिसांनी जे पुरावे सुप्रीम कोर्टाला दिले ते योग्य ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांना पुढील तपासाची परवानगी मिळाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

देशाच्या पंतप्रधनांच्या हत्येचाही कट या लोकांनी आखल्याचं पुराव्यातून समोर आलं आहे. देशातील जनतेची आपापसांमध्ये लढाई लावून देत असल्याचं पुराव्यातून दिसत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.देशाच्या सुरक्षेसोबत जे लोक खेळतात, त्यांना शिक्षा देण्याचं निश्चितपणे पोलिसांच्या माध्यमातून होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांच्याबाबात आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला.