|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » एसबीआय एटीएममधून आता काढता येणार 20,000 रूपये

एसबीआय एटीएममधून आता काढता येणार 20,000 रूपये 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एटीएममधून एकावेळी काढता येणाऱया रकमेची मर्यादा स्टेट बँक ऑफ इंडियाने निम्याने कमी केली आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या एटीएममधून एकावेळी आणि दिवसभरात जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढता येणार आहेत. रक्कम काढण्यावरील ही मर्यादा 31 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

देशभरात एटीएमचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. पण त्याचबरोबर एटीएम संबंधित गुह्यांचे प्रमाणही वाढते आहे. ग्राहकांच्या एटीएमचा पीन चोरून किंवा त्यांना कोंडीत पकडून चोरटे एटीएमच्या माध्यमातून मोठी रक्कम लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. एटीएममधून होणाऱया रोख रकमेच्या या चोरीला आळा घालण्यासाठी स्टेट बँकेने हे पाऊल उचलले आहे. ‘एटीएममधून काढत्या येणाऱया रकमेवर अधिकाधिक निर्बंध घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे एटीएम फ्रॉडचे प्रमाण कमी होईल. याआधी अनेक आंतरराष्ट्रीय बँकांनी एटीएमवर निर्बंध घालून फ्रॉडस्चे प्रमाण कमी केले आहे,’ अशी माहिती स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. एन. गुप्ता यांनी दिली. यामुळे कॅशलेस व्यवहारांनाही चालना मिळेल, अशीही चर्चा आहे.