|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मठ मंदिरात देव नाही ही चळवळ सुरू करावी

मठ मंदिरात देव नाही ही चळवळ सुरू करावी 

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   देव मेला आहे यावर जग प्रसिद्ध टाईम या मासिकाने 8 एपिल 1966 ला एक अंक प्रसिद्ध केला. त्यावेळेपासून देव हा धर्मशास्त्राबाहेरचा विषय बनला. प्रगत विज्ञानाचे आक्रमण तीव्र होत गेले दैनंदीन जीवनात देवाचे उच्चाटन झाले. यावेळी देव खरंच मेला आहे. अशी चळवळ युरोपने अमेरिकेत सुरू झाली. याच धर्तीवर भारतामध्ये मठ मंदिरातील देव संपला आहे अशी प्रबोधनाची चळवळ सुरू करण्याची गरज आहे. प्रबोधन साहित्य चळवळीतर्फे डॉक्टर जे बी शिंदे व डॉक्टर खाबडे यानी डॉ.सुभाष देसाई यांचा एम्स सत्कार शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात केला. याप्रसंगी अध्यात्माकडून प्रबोधनाकडे या विषयावर ते बोलत होते.

   डॉक्टर देसाई पुढे म्हणाले, तरुण पिढीने बरटांनड रसेल मानवेंदरनाथ रॉय, स्टीफन हॉकिंग आणि गौतम बुद्ध यांचे जर वाचन केले तर ते धार्मिक अतिरेकापासून दूर राहू शकतील. धर्मही जगभरची मानसिक शक्ती आहे. ती आणखी काही शतके मानवजातीवर राज्य करेल. काही धार्मिक संघटना खोटा सुचनांचा मारा करून बहुजन समाजाच्या मुलांचे खच्चीकरण करतात. डॉक्टर खाबडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले आपण सर्वांनी डॉक्टर सुभाष देसाईंना डिल्लीट ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्याबद्दल जो सत्कार केला तो उचित आहे त्यांचे काही तलस्पर्शी ग्रंथ मी वाचले आहे. अशी तलस्पर्शी आणि सर्वव्यापक विचारांची माणसे दुर्मिळ झाली आहेत.

 

Related posts: