|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » नजरेची भाषा सांगणारे हे मन बावरे

नजरेची भाषा सांगणारे हे मन बावरे 

प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते… म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. बऱयाच जणांना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, पण काहींच्या बाबतीत मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. हेच अनु आणि सिद्धार्थच्या बाबतीत देखील आहे. कोणता क्षण अनु आणि सिद्धार्थ यांना एकत्र आणणार? तो क्षण कधी येणार? हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे यांच्या नात्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे हे प्रेक्षकांना सुखाच्या सरींनी… हे मन बावरे या मालिकेमध्ये 9 ऑक्टोबरपासून रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती केली आहे मंदार देवस्थळी यांच्या टीमवर्क अल्ट्रा क्रिएशनने. मफणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मफणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राऊत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मध्यमवर्ग कुटुंबामधली अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचं आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. अनुश्री सगळय़ा घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन कुटुंबाचा सांभाळ हसतमुखानं करते आहे. ‘जेव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेव्हा मन:स्थिती बदलावी’ असे अनुचे आयुष्याबद्दलचे मत आहे. दुसऱया बाजूला सिद्धार्थ तत्ववादी हा गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू घरामधला, कतफ&त्ववान आणि आईवर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे. सिद्धार्थच्या घरामध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. परंतु, आजवर त्याला कोणतीच मुलगी आवडलेली नाही. अनु आणि सिद्धार्थचं भावविश्व खूप वेगळं आहे. लग्नाबद्दल या दोघांचंही मत वेगळं आहे. जेव्हा ही दोन वेगळी माणसं एकमेकांना भेटतील तेव्हा काय होईल? त्यांची मनं कशी जुळतील? हा प्रवास बघणं रंजक असणार आहे.

कथेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येकासाठी एक खास व्यक्ती या जगात असते. पण, ही खास व्यक्ती कधीच सूचना देऊन आयुष्यात येत नाही. ती व्यक्ती आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक भेटते आणि आपलं आयुष्य बदलून टाकते. असचं काहीसं अनु आणि सिद्धार्थच्या आयुष्यात घडणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, या कथेद्वारे आम्ही प्रेमकथा एका वेगळय़ाप्रकारे आणि वेगळय़ा दृष्टीकोनातून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेमाला अनेक पैलू असतात आणि त्यातलाच एक पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान आम्ही या मालिकेद्वारे स्वीकारले आहे.