|Sunday, March 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » सोनी मराठीवर ‘बघतोस काय… मुजरा कर!’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

सोनी मराठीवर ‘बघतोस काय… मुजरा कर!’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या गर्जा महाराष्ट्र या चित्रपटाचे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय… मुजरा कर!’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे.

 

जितेंद्र जोशी या हरहुन्नरी कलाकाराच्या दर्जेदार चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बघतोस काय… मुजरा कर!’ छत्रपती शिवाजीमहाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांनी बांधलेले किल्ले ही महाराष्ट्राची अभिमानस्थळं. पण महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वैभवाकडे तरुणाईचं होणारं दुर्लक्ष जितेंद्र जोशी यांच्या या चित्रपटातून अधोरेखित केलं गेलेलं आहे. नानासाहेब, पांडुरंग आणि शिवराज… या खरबुजेवाडीतल्या मावळ्यांची ही कथा येत्या १४ ऑक्टोबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्तानी सोनी मराठीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. शिवरायांच्या स्मारकावर होणाऱ्या खर्चाचा निम्मा भाग जरी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च झाला, तरी हा चित्रपट निर्माण केल्याचं सार्थक होईल आणि महाराष्ट्राचं वैभव उजळून निघेल असं या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात.

Related posts: