|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » वकिलांच्या सल्ल्याने नाना पाटेकरांचे मौन

वकिलांच्या सल्ल्याने नाना पाटेकरांचे मौन 

ऑनलाईन टीम / पुणे :

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांचे खंडण करण्यासाठी 8 रोजी नाना पाटेकर मिडियासमोर येऊन काय खुलासा करतात याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. त्यानुसार सोमवारी पहिल्यांदाच नाना पाटेकर पत्रकारांसमोर आले. मात्र वकिलांनी मला याबाबत मिडियाशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचे नानानी सांगितले.

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मी दहा वर्षांपूर्वीही स्पष्टीकरण दिलं होतं. 10 वर्षापूर्वी जे बोललो होतो तेच खरं आहे. त्यात आज काय बदल होणार आहे? असा सवालही नाना पाटेकरांनी यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला. त्यामुळे 8 रोजी नाना पाटेकर काय बोलणार याविषयीची शिगेला पोचलेली उत्सुकतेवर पडदा पडला.