|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अहिंसा पतसंस्था सहकार भारती पुरस्काराने सन्मानित

अहिंसा पतसंस्था सहकार भारती पुरस्काराने सन्मानित 

सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, पंढरपूरमध्ये सहकार भारती कार्यकर्ता अधिवेशन

वार्ताहर / म्हसवड

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी संस्था सहकार भारती यांच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाकडून पंढरपूर येथे सहकार भारती अधिवेशनात मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सहकार क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटविणारी अहिंसा पतसंस्था सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पंढरपूर येथे सहकार भारती कार्यकर्ता अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखरजी चारेगावकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र   अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांना देऊन गौरविण्यात आले.

गौरव म्हणजे दुग्धशर्करा योगच

चेअरमन नितिन दोशी आनंद व्यक्त करताना म्हणाले, जगाला अहिंसाचा संदेश देणाऱया महात्मा गांधीजीच्या जन्मदिनी म्हणजेच जागतिक अहिंसादिनी सहकार भारतीकडून अहिंसाचा गौरव म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे.

या गौरव सोहळ्याप्रसंगी सहकार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर चौगुले, संजय परिमने, अनिल पाटील, अप्पासाहेब राजोबा, सागर हुपरे तसेच अहिंसा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अजित व्होरा, संचालक महावीर व्होरा, सुजय दोशी, अनिल गाडे, अभिराज गांधी, व्यवस्थापक पतंगे, उपव्यवस्थापक आहेरकर, कर्मचारी उपस्थित होते.