|Friday, November 16, 2018
You are here: Home » उद्योग » मायक्रोमॅक्सचा स्मार्ट टीव्ही भारतात उपलब्ध

मायक्रोमॅक्सचा स्मार्ट टीव्ही भारतात उपलब्ध 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

ऑगस्टमध्ये यु एसचे लाँचिंग केल्यानंतर मायक्रोमॅक्स कंपनीने भारतात आपला पहिला एलईडी टीव्ही उपलब्ध केला आहे. त्याचे नाव यु युफोरिया असे असून किमत दिल्लीत 18500 रुपये ठेवण्यात आली आहे.

या नव्या उत्पादनाला भारतात चांगली लोकप्रियता मिळेल. त्यामुळे मायक्रोमॅक्सचा भारतातील बाजारपेठेमधील वाटा अधिक मोठा होईल. असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनी भारतात आपली आणखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने उतरविणार असून त्यामुळे कंपनीचा पाया मजबूत होण्यास सहाय्य होईल असेही सांगण्यात आले.

@            40 इंची स्क्रिन, 1920ƒ1080 पिक्सलचे रिझोलुशन व्हय़ुईंग अँगल 170 डिग्री

@            क्वॅडकोर प्रोसेसरची पॉवर, 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी, व्हायफायचीही सुविधा

@            अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिम, 3 एचडीएमआय पोर्ट, 2 युसबी 2.0 पोर्टस, 1 व्हीटीए पोर्ट

हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, सेट टॉप बॉक्स, गेमिंग सुविधा, लॅपटॉप सुविधा व इतर सोयी.

Related posts: